उत्पत्ती 35:22-26
उत्पत्ती 35:22-26 MARVBSI
इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते. लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून. राहेलीचे मुलगे : योसेफ व बन्यामीन. राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे : दान व नफताली. आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे : गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले.

