1
इफिसकरांना 2:10
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा इफिसकरांना 2:10
2
इफिसकरांना 2:8-9
देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.
एक्सप्लोर करा इफिसकरांना 2:8-9
3
इफिसकरांना 2:4-5
परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे
एक्सप्लोर करा इफिसकरांना 2:4-5
4
इफिसकरांना 2:6
आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले.
एक्सप्लोर करा इफिसकरांना 2:6
5
इफिसकरांना 2:19-20
तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे.
एक्सप्लोर करा इफिसकरांना 2:19-20