लूक वळख

वळख
लूक शुभवर्तमान हाई नवा करारना त्या चार पुस्तकामाईन एक शे ज्यानामा येशुना जिवनना वर्णन करेल शे, त्या प्रत्येक पुस्तकले शुभवर्तमान म्हणतस. येशुना मृत्युनंतर मत्तय, मार्क, अनी योहाननी पण हाई पुस्तक लिखेल शे. लूकनी फक्त येशुनं जिवन चरित्रच लिखं नही, तर त्याना मृत्यनंतर त्याना शिष्यसना कामसबद्ल लिखं. प्रेषितसना काम नावना पुस्तमा यानाबद्ल वाचाले भेटस. लूकना शुभवर्तमान कोठे अनी कवय लिखाई गयं यानाबद्ल माहीती नही. पण विद्वानसना अस मत शे की, लूकना शुभवर्तमान येशुना जन्मना लगभग ७० वरीस नंतर लिखामा वना व्हई.
हाई पुस्तकना लेखक स्वतः लूक शे, तो एक वैद्य व्हता, त्याना लिखाणा प्रकार अनी भाषामाईन हाई समजस की, लूक एक सुशिक्षीत माणुस व्हता. लूकनं अस मत व्हतं की, येशुना जिवननी घटना खरी-खरी लिखाई जावाले पाहिजे, अनी घटना जशी व्हयनी तशीच लिखाई जावाले पाहिजे. त्यामुये त्यानाबद्ल वाचीसन फायदा व्हई. १:१-३ लूक यहूदी नव्हता, कलस्सै ४:१०-१४ त्यानी अस प्रकारमा लिखं की, गैरयहूदी पण त्याना लिखाण समजु शकतीन, ज्याप्रकारमा यहूदी रितीरिवाजसना वर्णन करेल शे, त्यानामाईन हाई समजस की, १:८
खुप काही मात्रमा लूक शुभवर्तमान मत्तय अनी मार्कना पुस्तकनामायक शे, तिन्ही पुस्तकमा एकच घटनाबद्ल एकसारख वर्णन करामा येल शे, पण लूकना पुस्तकमा बाप्तिस्मा करनारा योहान जन्माबद्दल सर्वात जास्त माहिती मिळस. लूकमा क्षमा विषयी सर्वात जास्त लिखेल शे. ३:३, ११:४, १७:३-४, २३:३४, २४:४७. प्रार्थनाबद्ल सर्वात जास्त लिखं ३:२१, ५:१६, ६:१२, १७:१-१२, २२:३२.
रूपरेषा
१. लूक शुभवर्तमाननी भुमिका अनी लिखाणं कारण सांगस. १:१-४
२. बाप्तिस्मा करनारा योहान अनी येशुना जन्म अनी बालपण. १:५–२:५२
३. बाप्तिस्मा करनारा योहाननी सेवा. ३:१-२०
४. येशुना बाप्तिस्मा अनी परिक्षा. ३:२१–४:१३
५. गालीलमा येशुनी सेवा. ४:१४–९:५०
६. गालीलमाईन ते येरूशलेमपावत प्रवास. ९:५१–१९:२७
७. येरूशलेममा शेवटना आठवडा. १९:२८–२३:५६
८. येशुनं पुनरूत्थान, शिष्यसले दर्शन अनी स्वर्गरोहण. २४:१-५३

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte