Mufananidzo weYouVersion
Mucherechedzo Wekutsvaka

मत्तय 21

21
यरूशलेममा येशुना जयोत्सवमा प्रवेश
(मार्क ११:१-११; लूक १९:२८-४०; योहान १२:१२-१९)
1त्या यरूशलेमले ई राहींतात तवय जैतुनना डोंगरजोडे बेथफगे गावले पोहचनात; तवय येशुनी दोन शिष्यसले अस सांगीन धाडं की, 2तुम्हीन समोरना गावमा जा, अनी तठे जाताच एक बांधेल गधडी अनं तिनाजोडे एक शिंगरू तुमले दखाई; त्यासले सोडीसन मनाकडे आणा; 3अनी जर कोणी तुमले काही ईचारं, तर प्रभुले यानी गरज शे, अस सांगा म्हणजे त्या तुमले ते आणु देतीन. 4संदेष्टासद्वारे जी भविष्यवाणी व्हयेल व्हती ती पुरी व्हवाकरता हाई व्हयनं; ते अस की, 5#जखर्या ९:९सियोनना कन्याले सांगा, दखा, तुना राजा तुनाकडे ई राहीना; तो नम्र शे म्हणीन तो गधडावर, म्हणजे शिंगरूवर बशेल शे.
6तवय शिष्यसनी येशुना आज्ञाप्रमाणे करं; 7गधडी अनं शिंगरू यासले आणीन त्यासवर आपला कपडा टाकात अनं तो त्यावर बसना. 8मंग लोकसनी गर्दीमातीन बराच लोकसनी त्यासना कपडा वाटवर पसारात; बाकीनासनी झाडसन्या बारीक फांद्या तोडीन वाटवर पसाऱ्यात; 9अनी त्यानापुढे अनं मांगे चालणारा लोके गजर करीसन बोलणात, दावीदना पोऱ्याले होसान्ना#२१:९ होसान्ना देवनी स्तुती व्हवो, आमनं तारण कर.; प्रभुना नामतीन येणारा धन्यवादित असो स्वर्गलोकी “होसान्ना.” 10तो यरूशलेममा येवावर पुरा शहरमा च्यावच्याव व्हईनी अनी त्या बोलणात हाऊ कोण? 11लोकसनी गर्दी बोलणी, गालील प्रांतना नासरेथ गावतीन येल, हाऊ “येशु” संदेष्टा शे.
येशु मंदिरनं शुध्दीकरण करस
(मार्क ११:१५-१९; लूक १९:४५-४८; योहान २:१३-२२)
12नंतर येशु मंदिरमा गया; मंदिरमा ज्या खरेदी-विक्री करी राहींतात त्या सर्वासले त्यानी बाहेर हाकली दिधं. सोनारसना चौरंग अनी कबुतर ईकनारासना बैठकी त्यानी पालथ्या कऱ्यात. 13#यशया ५६:७; यिर्मया ७:११अनी त्यासले सांगं, “मना घरले प्रार्थना मंदिर म्हणतीन,” अस शास्त्रमा लिखेल शे; पण तुम्हीन त्याले “लुटारूसनी गुहा” करी राहीनात. 14मंग आंधया अनी लंगडा मंदिरमा त्यानाकडे वनात, त्यानी त्यासले बरं करं. 15तवय त्यानी करेल चमत्कार अनी दावीदना पोऱ्याले “होसान्ना” असा मंदिरमा गजर करनारा धाकला पोऱ्यासले दखीन मुख्य याजक अनं शास्त्री संतापनात, 16अनं त्याले बोलणात, ह्या काय म्हणी राहिनात हाई तुम्हीन ऐकं का? येशुनी त्यासले सांगं, हो; “धाकला अनं दुधपेता लेकरंसना तोंडघाई तु स्तुती करी लेयल शे; हाई तुम्हीन शास्त्रमा वाचं नही का?” 17नंतर तो त्यासले सोडीन शहरना बाहेर बेथानीले गया, अनं तठेच रातले मुक्काम राहिना.
निष्फळ अंजिरनं झाड
(मार्क ११:१२-१४,२०-२४)
18मंग सकायमा येशु परत नगरमा ई राहिंता तवय येशुले भूक लागणी. 19अनी वाटवर एक अंजिरनं झाड दखीसन तो त्यानाकडे गया; पण पानटासशिवाय त्यानावर त्याले काहीच भेटनं नही; मंग तो झाडले बोलना, यानापुढे तुले कधी फळ न येवो; अनी ते अंजिरनं झाड लगेच वाळी गयं. 20हाई दखीन शिष्यसले आश्चर्य वाटनं, अनं त्या बोलणात, अंजिरनं झाड लगेच कश काय वाळी गयं? 21#मत्तय १७:२०; १ करिंथ १३:२येशुनी त्यासले उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस, जर तुमनामा ईश्वास व्हई अनं मनमा तुम्हीन शंका धरी नही, तर अंजिरना झाडले जस करं, तसं तुम्हीन करशात, इतलंच नही, तर हाऊ डोंगरले तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस जर म्हणशात तर ते व्हई जाई. 22तुम्हीन प्रार्थनामा जे काही ईश्वास धरीन मांगशात ते सर्व तुमले भेटी.
येशुना अधिकारबद्दल प्रश्न
(मार्क ११:२७-३३; लूक २०:१-८)
23मंग तो मंदिरमा परत जाईसन शिकाडी राहिंता तवय मुख्य याजक अनी वडील लोके त्यानाजोडे ईसन बोलणात, तुम्हीन हाई कोणता अधिकारतीन करतस अनी तुमले हाऊ अधिकार कोणी दिधा? 24येशुनी त्यासले उत्तर दिधं, मी बी तुमले एक गोष्ट ईचारस, ती माले सांगशात तर कोणता अधिकारतीन मी हाई करस ते मी तुमले सांगसु. 25योहानना बाप्तिस्मा कोठेन व्हईना? स्वर्गकडतीन की माणुसकडतीन? तवय त्या आपसमा ईचार करू लागणात की, स्वर्गकडतीन अस म्हणं, तर हाऊ आपले म्हणी मंग तुम्हीन त्यानावर ईश्वास का ठेवतस नही? 26अनी जर माणुसकडतीन म्हणं तर आपले लोकसनी भिती वाटस कारण सर्वा लोके योहानले संदेष्टा मानतस. 27मंग त्यासनी येशुले उत्तर दिधं, आमले माहित नही, तो त्यासले बोलना, तर कोणता अधिकारतीन मी हाई करस, हाई पण मी तुमले सांगत नही.
दोन पोऱ्यासना दृष्टांत
28बरं तुमले काय वाटस ते सांगा? एक माणुसले दोन पोऱ्या व्हतात; तो पहिलाकडे जाईन बोलना, बेटा, आज द्राक्षमयामा जाईन काम कर; 29त्यानी उत्तर दिधं, मी नही जात; तरी त्याले थोडा येळमा पस्तावा वना अनी तो गया. 30मंग दुसराकडे जाईन त्यानी तसच सांगं; त्यानी उत्तर दिधं, हा मी जास; पण तो गया नही. 31ह्या दोन्हीसपैकी कोणी बापना ईच्छाप्रमाणे करा? त्या बोलणात, पहिलानी, येशुनी त्यासले सांगं, मी तुमले सत्य सांगस की, जकातदार अनं वेश्या तुमनापुढे देवना राज्यमा जातस. 32#लूक ३:१२; ७:२९,३०कारण योहाननी तुमले देवराज्यना मार्ग दखाडा अनं तुम्हीन त्याना ईश्वास करा नही; पण जकातदार अनं वेश्या यासनी त्यानावर ईश्वास करा; हाई दखीसन सुध्दा तुम्हीन त्याना ईश्वास करा नही अनी पश्चाताप बी करा नही.
द्राक्षमयाना दृष्टांत
(मार्क १२:१-१२; लूक २०:९-१९)
33आखो एक दृष्टांत ऐकी ल्या, एक माणुस व्हता, त्यानी द्राक्षमया बनाडा, त्याना आजुबाजू वडांग करी, त्यामा द्राक्षरसकरता कुंडी बनाडी अनं माळा बांधा अनी दुसरा शेतकरीले बटाईवर सोपीन परदेशले निंघी गया. 34नंतर फळसना हंगाम वना तवय त्यानी आपला उत्पन्नना वाटा लेवाकरता आपला दाससले त्या शेतकरीकडे धाडं. 35तवय शेतकरीनी त्याना काही दाससले धरीन मारं, काही जणसले दगडमार करा अनं काही जणसले मारी टाका. 36परत त्यानी पहिलापेक्षा जास्त दाससले धाडं; त्यासनासंगे बी त्यासनी तसच करं. 37शेवट त्या आपला पोऱ्याना तरी मान ठेवतीन म्हणीन त्यानी स्वतःना पोऱ्याले त्यासनाकडे धाडं; 38पण त्या शेतकरीसनी त्याले दखं अनं त्या एकमेकसले बोलणात, हाऊ वारीस शे; चला आपण याले मारी टाकुत म्हणजे मळाना मालक आपण व्हसुत. 39तवय त्यासनी त्याले धरीन द्राक्षमयाना बाहेर काढीन मारी टाकं. 40येशुनी त्यासले ईचारं, तर मंग द्राक्षमयाना मालक ई तवय तो त्या शेतकरीसनं काय करी? 41त्या त्याले बोलणात, तो त्या दुष्टसना हालहाल करीसन त्यासना नाश करी अनी ज्या शेतकरी हंगाममा त्याले ईमानदारीमा उत्पन्न देतीन असासले तो द्राक्षमया सोपी दि. 42येशु त्यासले बोलणा, ज्या दगडले बांधणारासनी नापसंत करा तोच कोणशीला व्हयना; हाई प्रभुकडतीन व्हयनं, अनं हाई आमना दृष्टीमा आश्चर्यकारक कृत्य शे; अस पवित्र शास्त्रमा तुमना वाचामा वनं नही का? 43यामुये मी तुमले सत्य सांगस की, देवनं राज्य तुमनापाईन हिसकाई लेतीन; अनं जी प्रजा त्यानं फळ दि, त्याच प्रजाले देवनं राज्य भेटी. 44जो ह्या दगडवर पडी त्याना चुराडा व्हई, पण ज्यानावर हाऊ दगड पडी त्याना भुगा-भूगा करी टाकी.#२१:४४ जो ह्या दगडवर पडी त्याना चुराडा व्हई, पण ज्यानावर हाऊ दगड पडी त्याना भुगा-भूगा करी टाकी. हाई वचन जुना शास्त्रसमा वाचाले मिळस नही. 45येशु हाऊ दृष्टांत आपले लाईनं बोलना हाई मुख्य याजक अनं परूशीसना ध्यानमा वनं. 46त्या त्याले धराले दखी राहींतात पण लोकसनी गर्दीनी त्यासले भिती वाटणी; कारण त्या त्याले संदेष्टा मानेत.

Zvasarudzwa nguva ino

मत्तय 21: Aii25

Sarudza vhesi

Pakurirana nevamwe

Sarudza zvinyorwa izvi

None

Unoda kuti zviratidziro zvako zvichengetedzwe pamidziyo yako yose? Nyoresa kana kuti pinda