YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

मार्क 7

7
पुर्वजसना परंपराना प्रश्न
(मत्तय १५:१-९)
1मंग परूशी अनं शास्त्री लोके यरूशलेमवरतीन ईसन येशुजोडे गोया व्हयनात.
2त्यासनी त्याना काही शिष्यसले अशुध्द हाततीन म्हणजे परूशीसना नियमना मायक हात नही धोता जेवण करतांना दखेल व्हतं. 3कारण परूशी अनी यहूदी लोके पुर्वजसंना परंपरानुसार हात निट धवाशिवाय जेयेत नही. 4त्या बाजार मातीन जे लयेत ते धवाशिवाय खायेत नही. अनी जसं कटोरा, घडा, तांबाना भांडा घशेत अनं धोयेत असा बराच नियम त्यासनी स्विकारेल व्हतात.
5यावरतीन परूशीसनी अनी शास्त्रीसनी येशुले ईचारं, “तुमना शिष्य अशुध्द हातघाई जेवतस, त्या पुर्वजसंना रितीरिवाजाप्रमाणे का बरं नही चालतस?”
6येशुनी उत्तर दिधं,
“तुमना मायक ढोंगीसबद्दल यशया संदेष्टानी चांगलाच संदेश देयल शे, तो असा शे की,
या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे?
7त्या स्वतःना नियमसले
देवना नियम बनाडीन शिकाडतस
अनी वायफळ मनी भक्ती करतस.”
8“तुम्हीन देवनी आज्ञा बाजुले करीसन माणससनी बनाडेल रितीरिवाजले चिटकी राहतस.”
9आखो येशु त्यासले बोलना, “तुम्हीन आपला रितीरिवाज पाळाकरता देवनी आज्ञा मोडाना चांगलाच मार्ग शोधी काढेल शे! 10कारण मोशेनी अशी आज्ञा देयेल शे की, ‘आपला बाप अनी माय यासना मान राख,’ अनी, ‘जो कोणी बाप किंवा मायनी निंदा करी त्याले मारी टाका.’ 11पण तुम्हीन म्हणतस जर कोणी आपला माय बापले अस सांगतस की, मी तुमले मदत करतु पण जे मनाकडे शे, ‘ते मी देवले अर्पण कराले ठेयेल शे.’ 12तर त्याले आपला माय किंवा बापले मदत नही करानं कारण भेटी जास. 13तसच तुम्हीन आपला रितीरिवाज चालु ठेवाकरता देवनं वचन मोडतसं अनी असा बऱ्याच गोष्टी करतस.”
मनुष्यले अशुध्द करनाऱ्या गोष्टी
(मत्तय १५:१०-२०)
14तवय येशुनी परत लोकसनी गर्दीले बलाईन सांगं, “तुम्हीन सर्व, मनं ऐकी ल्या, अनं समजी ल्या.” 15“अशी कोणतीच वस्तु नही जी बाहेरतीन माणुसमा जास अनी त्याले अपवित्र करस, तर जे माणुस मातीन निंघस ते त्याले अशुध्द करस, 16ज्यासले कान शेतस त्यासनी निट ऐकी ल्या.”#७:१६ हाई वचन, जुना ग्रंथसमा वाचामा येल नही शे.
17लोकसनी गर्दीले सोडीन जवय येशु घर गया, तवय शिष्यसनी त्यानी सांगेल दृष्टांतना अर्थ ईचारा. 18येशु त्यासले बोलना, “तुम्हीन पण इतला आडानी शेतस का? जे काही बाहेरतीन माणुसमा जास ते त्याले अशुध्द करू शकस नही हाई तुमले समजत नही का? 19ते मनमा नही जास तर ते पोटमा जास अनी ते शरिरमातीन बाहेर पडस.” अस सांगीसन त्यानी सर्व प्रकारनं अन्न शुध्द ठरावं.
20आखो तो बोलना, “जे माणुस माईन निंघस तेच माणुसले अशुध्द करस. 21कारण मझारतीन म्हणजे माणुसना मनमातीन दुष्ट ईचार निंघतस. अनैतीक कार्य, खुन, चोरी, 22व्यभिचार, लोभ, दुष्टता, कपटपणा, जळाऊपणा, चुगलीखोर, गर्विष्टपणा, मुर्खपणा. 23ह्या सर्व वाईट गोष्टी माणुस मातीन बाहेर निंघतस त्याच त्याले अशुध्द करतस.”
गैरयहूदी बाईना ईश्वास
(मत्तय १५:२१-२८)
24मंग येशु तठेन ऊठीसन सोर प्रांतना सिमावरला परीसरमा गया. तठे तो एक घरमा गया हाई कोणलेच समजाले नको अस त्यानी ईच्छा व्हती, पण त्याले लपीन राहता वनं नही. 25तवय एक बाईनी येशुबद्दल ऐकं, तिना धाकली पोरले दुष्ट आत्मा लागेल व्हता, ती बाई लगेच ईसन त्याना पाया पडनी. 26ती गैरयहूदी बाई व्हती, सिरियाना फेनीके प्रांतमा तिना जन्म व्हयेल व्हता. तिनी येशुले ईनंती करीसन सांगं, मनी पोर माधला दुष्ट आत्मा काढा. 27तवय येशुनी उत्तर दिधं, “पहिले पोऱ्यासले तृप्त होऊ दे. त्यासनं जेवण काढीसन कुत्रासले देनं बराबर नही शे.”
28तवय ती त्याले बोलनी, हाई खरं शे, “गुरजी, तरी कुत्रा पण पोऱ्यासना हातमाईन मेजनाखाल पडेल उष्ट खातस.”
29तवय येशुनी तिले सांगं, “तुनं बोलनं पटनं, शांतीमा जाय तुना पोर मधला दुष्ट आत्मा निंघी गया!”
30मंग ती घर गई; तिले दखायनं की, पोर आंथरून वर निजेल शे अनं तिना मधला दुष्ट आत्मा निंघी जायेल शे.
येशु मुका बहिरा माणुसले बरं करस
31तवय येशु सोर प्रांतमाईन निंघीसन सिदोनना रस्तावरतीन गालीलना समुद्रकडतीन दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरले वना. 32तठे काही लोकसनी येशुकडे एक मुका बहिरा माणुसले आनं अनी तुम्हीन त्यानावर हात ठेवा, अशी त्यासनी त्याले ईनंती करी. 33तवय येशु त्याले गर्दी माईन बाजुले लई गया त्याना कानमा बोटे टाकात नंतर तो थुंकना अनी त्या थुंकीना त्याना जिभले स्पर्श करा. 34अनं येशु स्वर्गकडे दखीसन दम लाईन, त्या माणुसले बोलना, “इफ्फाता” म्हणजे “मोकळा व्हय!”
35तवय त्याना कान मोकळा व्हयना अनं त्यानी जिभनी गाठ मोकळी व्हईन तो स्पष्ट बोलाले लागना. 36तवय हाई कोणलेच सांगानं नही अस येशुनी त्याले बजाईन सांगं पण त्यानी हाई गोष्ट सर्वासले सांगी दिधी. 37तवय ज्यासनी ऐकं त्या भलताच चकित व्हईसन बोलनात की, “हाऊ सर्वकाही कितलं चांगलं करी लेस!” अनं “हाऊ बहिरासले ऐकानी अनं मुकासले बोलानी शक्ती देस!”

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

मार्क 7: Aii25

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ