YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

लूक 2

2
येशुना जन्म
(मत्तय १:१८-२५)
1त्या दिनसमा अस व्हयनं की, सर्व रोमी साम्राज्यनी जनगणना व्हवाले पाहिजे अशी सम्राट कैसर औगुस्त यानी आज्ञा करी. 2हाई पहिली जनगणना व्हयनी तवय क्वीरीनिय हाऊ सिरिया प्रांतना सुबेदार व्हता. 3मंग सर्व लोके आपलाआपला गावले नाव नोंदाले गयात.
4योसेफ बी गालीलना नासरेथ गावतीन यहूदीयामधला बेथलहेम गावले म्हणजे दावीदना गावले गया कारण तो दावीदना घराणामधला अनं वंश मधला व्हता. 5तो आपली मागणी व्हयेल मरीयासंगे नाव नोंदाले गया, तिले दिन व्हतात. 6अनी त्या तठे व्हतात तवय अस व्हयनं की, तिना दिन पुरा व्हयनात. 7तिनी आपला पहिला पोऱ्याले जन्म दिधा अनी त्याले कापडमा गुंढाळीन गव्हाणीमा निजाडं, कारण त्यासले उतारशाळमा जागा नव्हती.
मेंढपाय अनी देवदूत
8त्याच प्रांतमा मेंढपाय जंगलमा राहिसन रातले आपला कळप सांभाळी राहींतात 9तवय प्रभुना एक दूत त्यासनासमोर ईसन उभा राहिना अनं प्रभुनं तेज त्यासना आजुबाजूले चमकनं अनी त्या घाबरनात. 10पण देवदूत त्यासले बोलणा, “घाबरू नका! कारण दखा जो मोठा आनंद सर्व लोकसले व्हणार शे, त्यानी सुवार्ता मी तुमले सांगस.” 11ती हाई की, तुमनाकरता आज दावीदना गावमा तारणारा जन्मेल शे, तो ख्रिस्त प्रभु शे! 12अनी तुमले खुण हाई शे की, कपडामा गुंढाळेल अनं गव्हाणीमा निजाडेल अस बाळ तुमले दखाई.
13इतलामा अचानक स्वर्ग माधला देवदूतसना घोळका त्या देवदूतजोडे प्रकट व्हयना; त्या देवनी स्तुती करीसन बोलनात,
14“स्वर्गलोकी देवले गौरव,
अनी पृथ्वीवर मनुष्यसमा शांती त्यासनावर तो प्रसन्न व्हयेल शे!”
15मंग असं व्हयनं की, देवदूत त्यासना जोडेतीन स्वर्गमा निंघी गयात तवय मेंढपाळ एकमेकसले सांगाले लागनात, “चला, आपण बेथलहेमले जाऊ अनं हाई जी घडेल गोष्ट प्रभुनी आपले सांगी ती दखु.”
16तवय त्या लगेच जाईन मरीया अनं योसेफ यासनाजोडे पोहंचनात अनी त्यासनी त्या बाळले गव्हाणीमा निजेल दखं. 17जवय मेंढपायनी त्यासले दखं तवय जी गोष्ट देवदूतनी बाळाबद्दल सांगेल व्हती ती त्यासले सांगी. 18मंग सर्व ऐकणारासले मेंढपाळसनी सांगेल गोष्टीसनं आश्चर्य वाटणं. 19पण मरीया ह्या गोष्टी मनमा ठेईन ईचार करत राहिनी. 20मंग देवदूतनी मेंढपायसले सांगेल व्हतं त्यानाप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकीसन अनं दखीसन; त्या देवना गौरव करत परत गयात.
येशुनं नामकरन
21 # लूक १:३१ मंग सुंताना आठवा दिन वना तवय त्यानं नाव येशु ठेवं, हाई तर तो पोटमा येवाना पहिलेच देवदूतनी ठेल व्हतं.
येशुले मंदिरमा लयतस
22मोशेना नियमशास्त्रप्रमाणे योसेफ अनी मरीयाना शुध्दीकरणना दिन भरनात तवय त्या बाळले देवले अर्पण कराकरता यरूशलेमले लई वनात. 23जसं की प्रभुना नियमशास्त्रमा लिखेल शे; “प्रत्येक पहिला जन्मेल नर प्रभुले अर्पण कराना.” 24अनी प्रभुना नियमशास्त्रमा लिखेलप्रमाणे, पारवासनी जोडी किंवा कबुतरना दोन पिल्ला आनीसन त्यासनं अर्पण करानं, याकरता त्यासनी त्याले यरूशलेमले आनं.
25यरूशलेममा शिमोन नावना एक धार्मीक अनी भक्ती करनारा माणुस व्हता, तो इस्त्राएलले वाचाडनारानी वाट दखी राहिंता अनी पवित्र आत्मा त्यानासंगे व्हता. 26अनी प्रभु ख्रिस्तले दखाना पहिले तु मराव नही अस पवित्र आत्मानी त्याले प्रकट करेल व्हतं 27शिमोन पवित्र आत्माना प्रेरणातीन मंदिरमा वना अनी जवय नियमशास्त्रना विधीप्रमाणे कराकरता येशु बाळाना मायबाप त्याले मंदिरमा लई वनात, 28तवय शिमोननी त्याले हातमा लिधं अनं देवले धन्यवाद दिसन बोलना;
29“हे प्रभु, आते तु माले जे वचन देयल व्हतं तसं,
तूना दासले म्हणजे माले शांतीमा मरू दे.
30कारण मना डोयासनी तुना ऊध्दार दखी लयेल शे,
31ज्याले तु सर्व लोकसना समोर तयार करेल शे;
32की, तो गैरयहूदी लोकसकरता प्रकाश
अनी तुना इस्त्राएलना लोकसनं वैभव राही.”
33शिमोननी येशु बाळबद्दल सांगेल गोष्टीसवरतीन त्याना माय बापले आश्चर्य वाटणं. 34शिमोननी त्यासले आशिर्वाद दिसन येशुनी माय मरीयाले सांगं दख, “हाई बाळ इस्त्राएलमधला बराच जणसना नाश अनं तारण याकरता अनी ज्यानाविरूध्द लोक बोलतीन असं चिन्ह व्हवाकरता याले देवनी निवडेल शे 35यामुये बराच लोकसना मनमाधला ईचार उघड व्हवाकरता तुना स्वतःना हृदयले तलवारनामायक दुःख चिरी जाई.”
36आशेरना वंशमातील फनूएलनी पोर हन्ना नावनी एक संदेष्टी व्हती, ती लगीनना सात वरीस नंतर तिना नवरा मरी गया, ती भलती म्हतारी व्हयेल व्हती. 37आते ती चौऱ्यांशी वरीसनी विधवा व्हती, तरी ती देवनं मंदिर कधीच सोडीन नही जाता रातदिन देवनी भक्ती करे अनं उपास प्रार्थना करे. 38त्याच येळले तिनी ईसन देवना आभार मानात अनी यरूशलेमनी सुटकानी ज्या वाट दखी राहींतात त्या सर्वासले तिनी त्या बाळबद्दल सांगं.
येशुनं धाकलपण
39 # मत्तय २:२३ मंग योसेफ अनी मरीया देवना नियमशास्त्रप्रमाणे सर्व संपाडीन, गालीलमाधला त्यासना नासरेथ गावले परत गयात. 40ते बाळ वाढाले लागनं अनी तो बलवान व्हयना त्याना ज्ञानमा वाढ व्हई राहिंती; त्यानावर देवनी कृपा व्हती.
येशुबाळ मंदिरमा
41येशुना मायबाप दर वरीसले वल्हांडण सणकरता यरूशलेमले जायेत. 42अनी तो बारा वरीसना व्हयना तवय त्या सणना रितप्रमाणे तठे गयात. 43मंग सण सरानंतर त्या घर जावाले निंघनात, तवय तो पोऱ्या येशु मांगे यरूशलेममा राही गया हाई त्याना माय बापले समजनं नही; 44तो वाटमाधला प्रवाशीससंगे येत व्हई, असं समजीन त्या एक दिननी वाट चाली गयात; नंतर त्या नातेवाईक अनं वळखना लोकसमा त्याना शोध कराले लागनात. 45पण तो त्यासले सापडना नही, म्हणीन त्या त्याना शोध करत करत यरूशलेमले परत गयात. 46मंग अस व्हयनं की तिन दिन नंतर तो मंदिरमा गुरूमंडळीमा बशीन त्यासनं भाषण ऐकतांना अनं त्यासले प्रश्न ईचारतांना त्यासले दखायना. 47ज्या सर्वाजन त्यानं ऐकी राहींतात त्या त्यानी बुध्दी वरतीन अनं उत्तरसवरतीन थक्क व्हयनात. 48तवय त्याले दखीसन त्याना माय बापले आश्चर्य वाटनं, अनी त्यानी माय त्याले बोलनी, “बाळा, तु आमनासंगे का बर असा वागना? तुना बाप अनी मी काळजी करीसन तुना शोध करत वनुत.”
49तो त्यासले बोलना, “तुम्हीन माले का बर शोधी राहींतात? तुमले माहीत नही का की, माले मना बापना घरमा ऱ्हावाले पाहिजे?” 50पण तो जे बोलना ते त्यासले समजनं नही.
51मंग तो त्यासनासंगे निंघीन नासरेथले गया अनं त्यासनी आज्ञामा राहीना; त्यानी मायनी ह्या सर्व गोष्टी आपला मनमाच ठेयात. 52येशु हाऊ ज्ञानघाई, शरीरघाई अनी माणुसना अनी परमेश्वरनी कृपामा वाढत गया.

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

लूक 2: Aii25

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ