YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Romans 4:1-8

रोमकरांस पत्र 4:1-8 - तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे?
कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही.
कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.”
आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते.
पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो.
ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो,
ते असे :
“ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे
व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य.
ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’

तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’

रोमकरांस पत्र 4:1-8

Romans 4:1-8