YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Romans 15:7-13

रोमकरांस पत्र 15:7-13 - म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा.
कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की,
“म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन
व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”
“परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर
जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो.
“सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा;
आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,”
असेही तो पुन्हा म्हणतो.
आणखी यशया म्हणतो,
“इशायाला अंकुर फुटेल,
तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील;
त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.”
आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.

म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.” “परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो. “सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,” असेही तो पुन्हा म्हणतो. आणखी यशया म्हणतो, “इशायाला अंकुर फुटेल, तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.” आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.

रोमकरांस पत्र 15:7-13

Romans 15:7-13