रोमकरांस पत्र 13:9-10

कारण “व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे. प्रीती शेजार्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
रोमकरांस पत्र 13:9-10