Romans 12:12-16

आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा; पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.
रोमकरांस पत्र 12:12-16