YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Romans 10:13-21

रोमकरांस पत्र 10:13-21 - कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील?
आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.
तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो,
“हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर
कोणी विश्वास ठेवला आहे?”
ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते.
पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते.
“त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर,
व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”
आणखी मी विचारतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो,
“जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे
मी तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन,
एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हांला चीड आणीन.”
आणि यशया फार धीट होऊन म्हणतो,
“जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो;
जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.”
पण इस्राएलाविषयी तो म्हणतो,
“आज्ञा मोडणार्‍या व उलटून बोलणार्‍या लोकांकडे
मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”

कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?” ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.” आणखी मी विचारतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हांला चीड आणीन.” आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो; जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.” पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, “आज्ञा मोडणार्‍या व उलटून बोलणार्‍या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”

रोमकरांस पत्र 10:13-21

Romans 10:13-21