YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Psalm 77:1-10

स्तोत्रसंहिता 77:1-10 - मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन.
माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना.
मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो.
(सेला)
तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस; मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही.
पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत.
रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की,
“प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय?
त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?
देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?”
(सेला)
“परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले.

मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना. मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो. (सेला) तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस; मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही. पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत. रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की, “प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय? त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला) “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले.

स्तोत्रसंहिता 77:1-10

Psalm 77:1-10