Psalms 68:4-6

देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो; बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो; परंतु बंडखोर रुक्ष प्रदेशात राहतात.
स्तोत्रसंहिता 68:4-6