Psalms 47:1-6

अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला) जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
स्तोत्रसंहिता 47:1-6