Psalms 30:5-10

त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो. मी तर आपल्या संपत्काली म्हटले, “मी कधी ढळणार नाही.” हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला; परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो, “मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय? हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.”
स्तोत्रसंहिता 30:5-10