Psalms 22:1-6

माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे.
स्तोत्रसंहिता 22:1-6