स्तोत्रसंहिता 19:7-9

परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.
स्तोत्रसंहिता 19:7-9