YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Psalm 19:1-9

स्तोत्रसंहिता 19:1-9 - आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते
दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही.
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.
शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो.
आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.
परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.
परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.

आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.

स्तोत्रसंहिता 19:1-9

Psalm 19:1-9