देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?
तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो.