Psalms 145:17-21

परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणार्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.
स्तोत्रसंहिता 145:17-21