Psalm 139:16-19

मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्यांनो, माझ्यापासून दूर व्हा.
स्तोत्रसंहिता 139:16-19