Psalms 127:1-5

परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्यांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 127:1-5