YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Psalm 122:1-9

स्तोत्रसंहिता 122:1-9 - “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात,
कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.
यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.
तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.”
माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन.
परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.

“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.

स्तोत्रसंहिता 122:1-9

Psalm 122:1-9