YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 121:1-8

स्तोत्रसंहिता 121:1-8 - मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?
आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.
पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही.
परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.
परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.