YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:1-24

स्तोत्रसंहिता 119:1-24 - जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात.
तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही.
तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन.
मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस.

तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.
तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो.
मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.

आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन.
तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस.
तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे.
गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत.
निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो.
अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो.
तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.

जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य! जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य! ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही. तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही. आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस. तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत. निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो. अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.

स्तोत्रसंहिता 119:1-24