परमेश्वराचे भय धरणार्या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.
परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.
आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो.
स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.