YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Proverbs 9:10-18

नीतिसूत्रे 9:10-18 - परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.
कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील.
तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील.
मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही.
ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते;
आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे
ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते,
“चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;”
पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.

परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, “चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;” पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.

नीतिसूत्रे 9:10-18

Proverbs 9:10-18