सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.
तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा.
तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्चित असोत.