मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.
सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.
परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.
जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते.