Proverbs 1:7-15

परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू; त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;” तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.
नीतिसूत्रे 1:7-15