YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Micah 6:1-8

मीखा 6:1-8 - आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे.
पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.
“हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे.
मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.
माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?
“मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय?
हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?”
हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?

आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे. “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले. माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे? “मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?” हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?

मीखा 6:1-8

Micah 6:1-8