मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.