YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Книга пророка Малахии 3:1-5

मलाखी 3:1-5 - पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;
रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील.
पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.
मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.

पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल. मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.

मलाखी 3:1-5

Книга пророка Малахии 3:1-5