तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,
“‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा
‘धन्यवादित असो;’
स्वर्गात शांती,
आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”