Luke 12:1-3

इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल.
लूक 12:1-3