John 16:8-13

तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील : ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी; मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी; आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी, मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील.
योहान 16:8-13