YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Jeremiah 1:4-14

यिर्मया 1:4-14 - परमेश्वराचे वचन मला आले ते असे :
“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”
तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”
मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.
त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;
पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”
मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “यिर्मया तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या1 झाडाची डाहळी दिसते.”
परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”
परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल.

परमेश्वराचे वचन मला आले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “यिर्मया तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या1 झाडाची डाहळी दिसते.” परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.” परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल.

यिर्मया 1:4-14

Jeremiah 1:4-14