James 4:7-12

म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो. प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण?
याकोब 4:7-12