James 1:12-21

जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका; प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.
याकोब 1:12-21