Isaiah 43:18-25

“पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार; मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही. तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस. मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.
यशया 43:18-25