यशया 25:1-5

हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्त्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत. तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही. ह्यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करतील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरतील. कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास. रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्यांचे जयगीत होते.
यशया 25:1-5