YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Hebrews 5:6-14

इब्री 5:6-14 - त्याप्रमाणेच दुसर्‍या ठिकाणीही तो म्हणतो,
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू युगानुयुग याजक आहेस.”
आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;
तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;
आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,
आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.

ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात.
वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात.
कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे;
पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.

त्याप्रमाणेच दुसर्‍या ठिकाणीही तो म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली; तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला, आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे; पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.

इब्री 5:6-14

Hebrews 5:6-14