Hebrews 11:1-4

विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.
इब्री 11:1-4