Galatians 4:4-7

परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने “अब्बा! बापा!” अशी हाक मारणार्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस तर ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा वारसही आहेस.
गलतीकरांस पत्र 4:4-7