Ezekiel 37:4-6

तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
यहेज्केल 37:4-6