YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Ecclesiastes 4:9-16

उपदेशक 4:9-16 - एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.
त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.
दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?
जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.
अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.
कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला.
हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले.
ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.

एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा. कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला. हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले. ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.

उपदेशक 4:9-16

Ecclesiastes 4:9-16