Ecclesiastes 3:10-13

मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.
उपदेशक 3:10-13