Ecclesiastes 11:4-6

जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही. वार्याची1 गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही; तसेच सर्वकाही घडवणार्या देवाची कृती तुला कळत नाही. सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.
उपदेशक 11:4-6