Ecclesiastes 11:1-6

आपले अन्न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही. मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार. जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही. वार्याची1 गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही; तसेच सर्वकाही घडवणार्या देवाची कृती तुला कळत नाही. सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.
उपदेशक 11:1-6