YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Deuteronomy 6:4-12

अनुवाद 6:4-12 - हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.
ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव;
आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.
त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव.
आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.

तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत,
तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील.
ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप.

हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप.

अनुवाद 6:4-12

Deuteronomy 6:4-12